Solapur Floods : सोलापुरला मुसळधार पावसानं झोडपलं, सीना नदीच्या पुराचा पुन्हा फटका अन् गाव पाण्याखाली

Solapur Floods : सोलापुरला मुसळधार पावसानं झोडपलं, सीना नदीच्या पुराचा पुन्हा फटका अन् गाव पाण्याखाली

| Updated on: Sep 29, 2025 | 12:12 PM

मुसळधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला पुन्हा पूर आला आहे. उत्तर सोलापूरसह माढा, करमाळा, मोहोळ, दक्षिण सोलापूरमधील अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. सीना कोळेगाव, खासापूर आणि चांदणी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.

मुसळधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला पुन्हा एकदा पूर आला आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून जिल्ह्यातील माढा, करमाळा, मोहोळ, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापुरातील अनेक तालुके व गावांना या पुराचा मोठा फटका बसत आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील तिन्हे गावात पुन्हा पाणी शिरायला सुरुवात झाली असून, चार दिवसांपूर्वी आलेल्या पुरामुळे याच भागातील घरांमध्ये पाणी शिरले होते. सध्या सीना नदीमध्ये 1 लाख 45 हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले आहे.

सीना कोळेगाव प्रकल्प, खासापूर आणि चांदणी या मध्यम प्रकल्पातून हे पाणी सोडण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज मध्यरात्रीपर्यंत सीना नदीत 1 लाख 80 हजारांपेक्षा अधिकचा विसर्ग सोडण्यात येणार आहे. यामुळे अनेक गावे पुन्हा पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त होत आहे. नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे, तर व्यावसायिक आणि शेतकऱ्यांनाही याचा फटका बसला आहे.

Published on: Sep 29, 2025 12:11 PM