Solapur Crime : पूजा आयुष्यात आली अन् घात झाला… एका नर्तकीमुळे उपसरपंच जीवानिशी गेला, अखेर त्या महिलेवर…

Solapur Crime : पूजा आयुष्यात आली अन् घात झाला… एका नर्तकीमुळे उपसरपंच जीवानिशी गेला, अखेर त्या महिलेवर…

| Updated on: Sep 10, 2025 | 5:27 PM

गेवराई येथील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी ९/९/२०२५ रोजी आत्महत्या केली. महिलेवर बर्गे यांच्याकडून पैसे आणि मालमत्ता मिळविण्याचा आरोप आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांनी ९ सप्टेंबर २०२५ रोजी आत्महत्या केली. त्यांच्या चारचाकी गाडीत स्वतःवर पेट्रोल ओतून आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेनंतर त्यांच्या नातेवाईकांनी वैरागपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, पोलिसांनी या प्रकरणी कला केंद्रातील पूजा गायकवाड असं नाव असणाऱ्या नर्तकीवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. नातेवाईकांनी तक्रार केल्यानंतर वैरागपूर पोलीस ठाण्याने या महिलेवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीत असे म्हटले आहे की, महिलेने बर्गे यांच्याशी बराच काळ प्रेमसंबंध ठेवले होते आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतले होते. तसेच, तिने जमीन आणि बंगला तिच्या नावावर करण्यासाठी त्यांना धमकावले होते. पोलिसांनी महिलेवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील तपास सुरू आहे.

Published on: Sep 10, 2025 05:27 PM