Video: हरभजन सिंग म्हणाला रेमडेसिव्हिर इंजेक्शनची गरज, भज्जी, पोहोचवलं जाईल, म्हणत सोनू सूदची मदत
कोरोनाचं संकट काळात सोनू सूद सातत्याने देशभरातील जनतेच्या मदतीला धावून जात आहे. (Sonu Sood Harbhajan Singh)
नवी दिल्ली: कोरोनाचं संकट काळात सोनू सूद सातत्याने देशभरातील जनतेच्या मदतीला धावून जात आहे. स्वत: सोनूलाही कोरोनाची लागण झाली होती. त्या काळात सोनू होम क्वारंटाईन होता. त्यावेळीही त्याने लोकांची मदत करण्याचं काम सुरुच ठेवलं. आता कोरोनामुक्त झाल्यावर सोनू पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी मैदानात उतरलाय.. हरभजन सिंग याने 12 मे रोजी एक ट्विट करत अर्जंट एका रेमडेसिव्हिर इंजेक्शनची गरज आहे, असं म्हणत त्याने आपल्या ट्विटमध्ये पत्ता लिहिला होता. यावर लगेचच सोनू सूदने लगेचच रिप्लाय करुन पोहोचवलं जाईल, असा रिप्लाय केला.
सोनूने हरभजनच्या ट्विटला काय रिप्लाय दिला?
कर्नाटकमधल्या बसप्पा हॉस्पिटलमध्ये एका व्यक्तीच्या उपचाराकरिता रेमडेसिव्हर इंजेक्शनची गरज असल्याचं ट्विट हरभजनने केलं. तसंच त्याने हॉस्पिटलचा पूर्ण पत्ता आपल्या ट्विटमध्ये मेन्शन केला. सोनू सूदने हे ट्विट वाचून लगोलग रिप्लाय केला. भज्जी, पोहोचवलं जाईल, असं म्हणत त्याने ते इंजेक्शन पोहोचवलं देखील…!
