Special Report | एसटीच्या संपावरून भाजप Vs सरकार

Special Report | एसटीच्या संपावरून भाजप Vs सरकार

| Edited By: | Updated on: Nov 10, 2021 | 9:00 PM

सध्या महाराष्ट्रात सर्वात मोठा मुद्दा म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. एसटी कर्मचारी त्यांच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले असताना यावरुन महाराष्ट्राच्या राजकारणातही हेवेदावे सुरु झाले आहेत.

सध्या महाराष्ट्रात सर्वात मोठा मुद्दा म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. एसटी कर्मचारी त्यांच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले असताना यावरुन महाराष्ट्राच्या राजकारणातही हेवेदावे सुरु झाले आहेत. त्यामुळे एसटी कर्मचारी आंदोलनावरुन राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. भाजप नेत्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला आहे. गोपीचंद पडळकर यांच्यासह प्रवीण दरेकर, किरीट सोमय्या, सदाभाऊ खोत यांनी आज परिवहन मंत्री अनिल परब आणि ठाकरे सरकारवर जोरदार टीका केलीय. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर पलटवार केलाय. या सर्व प्रकरणावरील हा स्पेशल रिपोर्ट…