Special Report | पंढरपूर पाठोपाठ देगलूर काबिज करण्याची भाजपची रणनिती

| Updated on: Oct 01, 2021 | 9:02 PM

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर आता देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसला झटका देण्यासाठी भाजपनं रणनिती आखली आहे. पोटनिवडणुकीसाठी (Deglur Biloli) काँग्रेसकडून जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. जितेश हे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर (Raosaheb Antapurkar) यांचे सुपुत्र आहेत. दुसरीकडे भाजपाकडून शिवसेनेचे सुभाष साबणे इच्छुक आहेत. सुभाष साबणे हे माजी आमदार असून, त्यांनी रावसाहेब अंतापूरकर यांच्याविरोधात शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती.

Follow us on

नांदेडमधील देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Deglur Biloli) काँग्रेसकडून जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. जितेश हे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर (Raosaheb Antapurkar) यांचे सुपुत्र आहेत. रावसाहेब अंतापूरकर यांचं कोरोनाने निधन झाल्यामुळे देगलूर-बिलोली मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. देगलूर विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे, त्यामुळे त्या जागेवर आम्ही त्याच पक्षाचा म्हणजेच काँग्रेसचाच उमेदवार देणार आहोत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

दुसरीकडे या पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून शिवसेनेचे सुभाष साबणे इच्छुक आहेत. सुभाष साबणे हे माजी आमदार असून, त्यांनी रावसाहेब अंतापूरकर यांच्याविरोधात शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. सुभाष साबणे शिवसेना सोडून भाजपकडून उमेदवारी घेण्याच्या तयारीत आहे. मुंबईत याबाबत भाजपची काल बैठक झाली. भाजपकडे तुल्यबळ उमेदवार नसल्याने माजी आमदार सुभाष साबणे याना संधी मिळू शकते.

महत्वाची बाब म्हणजे पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर आता देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसला झटका देण्यासाठी भाजपनं रणनिती आखली आहे.