Special Report | सत्ताधाऱ्यांच्या घोषणाबाजीनं राज्यपाल Bhagat Singh Koshyari संतापले -Tv9
औरंगाबाद येथे चार दिवसांपूर्वी त्यांनी शिवाजी महाराजांविषयीचं एक वक्तव्य केलं होतं. समर्थ रामदासांशिवाय शिवाजी महाराजांच्या जीवनाला काय अर्थ, अशा आशयाचं वक्तव्य केल्याने राज्यपालांविरोधात राष्ट्रवादी सह महाविकास आघाडी सरकारचे नेते आक्रमक झाले आहेत.
आज महाविकास आघाडीने विधी मंडळात राज्यपालांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलन छेडलं. औरंगाबाद येथे चार दिवसांपूर्वी त्यांनी शिवाजी महाराजांविषयीचं एक वक्तव्य केलं होतं. समर्थ रामदासांशिवाय शिवाजी महाराजांच्या जीवनाला काय अर्थ, अशा आशयाचं वक्तव्य केल्याने राज्यपालांविरोधात राष्ट्रवादी सह महाविकास आघाडी सरकारचे नेते आक्रमक झाले आहेत. आज विधीमंडळात शिवसेना नेते आदित्य ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजय वडेटटीवार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारच्या वतीने ‘राज्यपाल हटाव’ ची मोहीम हाती घेतली. शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या राज्यपालांचा धिक्कार असो, अशी घोषणाबाजी करण्यात आली.
