Special Report | मुंबईवरचा हल्ला ते केदारनाथ…MI-17 चं महत्व काय?

| Updated on: Dec 09, 2021 | 11:23 PM

जगातले 60 देश जे हेलिकॉप्टर वापरतात, तेच हे MI 17- V 5 हेलिकॉप्टर. या हेलिकॉप्टरला दुश्मनांचा कर्दनकाळ म्हटलं जातं. अत्याधुनिक हेलिकॉप्टर्सपैकी MI 17 चं नाव अग्रस्थानी आहे. केदारनाथ आणि इतर ठिकाणच्या नैसर्गिक आपत्तीवेळी याच हेलिकॉप्टरनं असंख्य लोकांचे प्राण वाचवले. नेपाळ भूकंपावेळी भारताचे दोन MI सेव्हन्टिंन हेलिकॉप्टर्स तातडीनं मदतीला धावले.

Follow us on

जगातले 60 देश जे हेलिकॉप्टर वापरतात, तेच हे MI 17- V 5 हेलिकॉप्टर. या हेलिकॉप्टरला दुश्मनांचा कर्दनकाळ म्हटलं जातं. अत्याधुनिक हेलिकॉप्टर्सपैकी MI 17 चं नाव अग्रस्थानी आहे. केदारनाथ आणि इतर ठिकाणच्या नैसर्गिक आपत्तीवेळी याच हेलिकॉप्टरनं असंख्य लोकांचे प्राण वाचवले. नेपाळ भूकंपावेळी भारताचे दोन MI सेव्हन्टिंन हेलिकॉप्टर्स तातडीनं मदतीला धावले. 2008 मध्ये मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यावेळी एनएसजीचे कमांडो याच हेलिकॉप्टरनं मुंबईत पोहोचले. पंतप्रधान मोदींसह अनेक व्हीव्हीआयपींच्या मुव्हमेंटवेळी MI सेव्हन्टिंन हेलिकॉप्टर्सच सर्वात आधी गिरट्या घालतात. स्वतः पंतप्रधान मोदी अनेकदा MI सेव्हन्टिंन हेलिकॉप्टरनंच प्रवास करतात.

कोणत्याही तापमानात गगनचुंबी पहाडांच्या उंचीची स्पर्धा करणारं हेलिकॉप्टर म्हणून MI सेव्हन्टिंनची ख्याती आहे, कारगीलचे 18 हजार फुटांपर्यंतचे पर्वत असोत, की मग हाडं वितळवणारी केदारनाथची थंडी, MI 17 हेलिकॉप्टर प्रत्येक आव्हानावर खरं उतरलं आहे. श्रीनगरपासून कारगीलपर्यंत, कारगीलपासून लडाखपर्यंत, लडाखपासून केदारनाथ आणि पुढे केदारनाथापासून ईशान्य भारतापर्यंत, जोखमीच्या मोहिमा असोत किंवा नैसर्गिक आपत्ती. MI सेव्हन्टिंन हेलिकॉप्टरच भारतीय वायुसेनेचं सर्वात भरवश्याचं हत्यार राहिलं आहे. मात्र कुन्नूरचा पहाड या भरवश्याच्या MI सेव्हन्टिंन हेलिकॉप्टरसाठी अपवाद ठरला.