Special Report | सर्वच राजकीय पक्षांकडून नाशिक महापालिका निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात

| Updated on: Aug 28, 2021 | 9:50 PM

आगामी महापालिका निवडणुकांच्या (Nashik Municipal Election) पार्श्वभूमीवर मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) चार दिवसांच्या नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत. कोणतंही सरकार कायम नसतं, लोक बघत असतात कोण काम करतंय आणि कोण नाही. लोक सूज्ञ असतात, असं म्हणत अमित ठाकरे यांनी नाशिकच्या मैदानात पहिली गर्जना केली. तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊतही आज नाशिक दौऱ्यावर होते.

Follow us on

आगामी महापालिका निवडणुकांच्या (Nashik Municipal Election) पार्श्वभूमीवर मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) चार दिवसांच्या नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत. अमित ठाकरे यांच्या सोबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर ,संदीप देशपांडे, अमेय खोपकर हे देखील या दौर्‍यात सहभागी होणार आहेत. कोणतंही सरकार कायम नसतं, लोक बघत असतात कोण काम करतंय आणि कोण नाही. लोक सूज्ञ असतात, असं म्हणत अमित ठाकरे यांनी नाशिकच्या मैदानात पहिली गर्जना केली. तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊतही आज नाशिक दौऱ्यावर होते. नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना संजय राऊत यांनी हे सूचक विधान केलं. नाशिकमध्ये शिवसेनेचे वातावरण आहे. सरकारला नाशिक सारख्या शहरांची ताकद मिळत राहिली पाहिजे. अजून एखादा कार्यक्रम करेक्ट करून टाकू. कार्यक्रम केल्यावर परिणामांची पर्वा करत नाही, असं राऊत म्हणाले. त्यामुळे नाशिक महापालिकेसाठी आता सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावल्याचं पाहायला मिळत आहे.