Special Report | Mumbai ते Osmanabad पर्यंत Nawab Malik यांची संपत्ती जप्त -tv9

| Updated on: Apr 13, 2022 | 9:10 PM

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित व्यक्तींशी, ज्या मनी लाँड्रिंग प्रकरणात मंत्री मलिक जेलमध्ये गेलेत. त्याच प्रकरणात मलिकांची संपत्ती आता ईडीकडून जप्त करण्यात आलीय. जप्त केलेल्या संपत्तीमध्ये मुंबईतले 5 फ्लॅट ज्यात कुर्ल्यातले 3 फ्लॅट तर वांद्र्यातल्या 2 फ्लॅटचा समावेश आहे. कुर्ल्यातील गोवावाला कम्पाऊंडही जप्त झालंय.

Follow us on

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित व्यक्तींशी, ज्या मनी लाँड्रिंग प्रकरणात मंत्री मलिक जेलमध्ये गेलेत. त्याच प्रकरणात मलिकांची संपत्ती आता ईडीकडून जप्त करण्यात आलीय. जप्त केलेल्या संपत्तीमध्ये मुंबईतले 5 फ्लॅट ज्यात कुर्ल्यातले 3 फ्लॅट तर वांद्र्यातल्या 2 फ्लॅटचा समावेश आहे. कुर्ल्यातील गोवावाला कम्पाऊंडही जप्त झालंय. कुर्ल्यातील व्यावसायिक युनिटही जप्त झालंय. उस्मानाबादेतील 148 एकर शेतजमिनीवरही टाच आणण्यात आलीय. 1993 च्या बॉम्बस्फोटातील गुन्हेगार सरदार शहावली खान आणि सलीम पटेलकडून जमीन खरेदीचा आरोप फडणवीसांनी केला होता. त्यावरुन अधिवेशनात भाजप आक्रमकही झाली. ईडीनं दिलेल्या माहितीनुसार, कुर्ल्यातील मुनिरा प्लंबर यांची मालमत्ता हडप करण्याच्या उद्देशानं बनावट कागदपत्र तयार केली मलिकांच्या कुटुंबीयांपैकी एकाच्या मालकीची सोडियम इन्वेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे या कंपनीसोबत दाऊदची बहीण हसीना पारकर आणि दाऊदशी संबंधित व्यक्तींनी जमीन हडप केली.