Special Report | पवारांच्या विचारांना भगवं कव्हर घातलं, राऊतांकडून कौतुकाबरोबरच हलक्या हाताचे चिमटे

| Updated on: Dec 12, 2021 | 12:07 AM

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज नेमकचि बोलणे या त्यांच्या भाषण संग्रहाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार भाषण करत भाजपवर हल्ला चढवला. यावेळी राऊतांनी प्रसिद्ध कवी किशोर कदम यांची कविता सादर करून भाजपला जोरदार टोले लगावले. राऊत यांनी म्हटलेल्या या कवितेला सर्वांनीच हसून दाद दिली.

Follow us on

कधी रोखठोक बोलण्यातून, कधी धारदार लेखणीतून तर कधी ट्विटवरवरील शायरीतून भाजपची पिसे काढणाऱ्या शिवसेना नेते संजय राऊतांनी आज चक्क कवितेतून भाजपवर हल्लाबोल चढवला. राऊतांच्या या कवितेला संपूर्ण सभागृहाने डोक्यावर घेतलंच, पण खुद्द शरद पवारांनाही मिष्किल हसत या कवितेला दाद दिली. निमित्त होतं, नेमकचि बोलणे या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचं.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज नेमकचि बोलणे या त्यांच्या भाषण संग्रहाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार भाषण करत भाजपवर हल्ला चढवला. यावेळी राऊतांनी प्रसिद्ध कवी किशोर कदम यांची कविता सादर करून भाजपला जोरदार टोले लगावले. राऊत यांनी म्हटलेल्या या कवितेला सर्वांनीच हसून दाद दिली.

शरद पवार यांनी नेहमीच देशाला आणि राज्याला दिशा देण्याचं काम केलं आहे. पवारांचे जे विचार 25 वर्षापूर्वी होते. ते आताही कायम आहेत. त्यांच्या विचारात काहीच बदल झालेला नाही. जेव्हा युतीचं सरकार होतं तेव्हा त्यांनी म्हटलं होतं हे पंताचं सरकार आहे. मुंबईतील जमिनी व्यापाऱ्यांना विकू नका असं त्यांनी म्हटलं होतं. मुंबईतील मराठी माणसांची पकड कमी होऊ नये असं त्यांनी सांगितलं होतं, असंही राऊत म्हणाले.