Special Report | आयकर छाप्यांमुळं शिवसेनेचे Yashwant Jadhav अडचणीत -Tv9

| Updated on: Mar 20, 2022 | 9:25 PM

पालिकेचा स्थायी समिती अध्यक्षांची श्रीमंती सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांची केवळ दोन वर्षात तब्बल 38 फ्लॅट आणि ऑफिस मालमत्तांची खरेदी केल्याचं समोर आलं आहे.

Follow us on

देशातील सर्वात श्रीमंत पालिका म्हणून बीएमसी ओळखली जाते. या पालिकेचा स्थायी समिती अध्यक्षांची श्रीमंती सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांची केवळ दोन वर्षात तब्बल 38 फ्लॅट आणि ऑफिस मालमत्तांची खरेदी केल्याचं समोर आलं आहे. स्थायी समिती अध्यक्ष झाल्यापासून जाधवांच्या संपत्तीत घसघशीत वाढ झाली असल्याचे आरोप केले जात होते. अशातच मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केवळ दोन वर्षात तब्बल 38 ठिकाणी वेगवेगळ्या प्रॅापर्टी खरेदी केल्याचा धक्कादायक अहवाल टीव्ही 9 मराठीच्या हाती लागलाय. यशवंत जाधव आणि त्यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे अगरवाल यांनी मुंबईत सुमारे 38 मालमत्तांची खरेदी केलेली आहे.