Special Report | भाजप-मनसे युतीची शक्यता का?-TV9

| Updated on: Apr 29, 2022 | 9:03 PM

सध्या राजकीय वर्तुळात चर्चा एकच आहे, की भाजप आणि मनसेची युती होणार का ?...आणि त्याची तीन-चार प्रमुख कारणं आहेत. राज ठाकरे कट्टर हिंदुत्वाच्या ट्रॅक आलेत. राज ठाकरेंनी गेल्या 2 सभेत योगी, मोदींचं कौतुक केलं. राज ठाकरेंनी दोन्ही सभेत भाजपवर टीकाच केलेली नाही. राज ठाकरेंच्या भूमिकांना भाजप जाहीर पाठींबाही देतेय.

Follow us on

सध्या राजकीय वर्तुळात चर्चा एकच आहे, की भाजप आणि मनसेची युती होणार का ?…आणि त्याची तीन-चार प्रमुख कारणं आहेत. राज ठाकरे कट्टर हिंदुत्वाच्या ट्रॅक आलेत. राज ठाकरेंनी गेल्या 2 सभेत योगी, मोदींचं कौतुक केलं. राज ठाकरेंनी दोन्ही सभेत भाजपवर टीकाच केलेली नाही. राज ठाकरेंच्या भूमिकांना भाजप जाहीर पाठींबाही देतेय. त्यामुळं भाजप-मनसेची युती होईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षांपासून ते केंद्रीय मंत्री दानवेंच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत. सध्या तरी युतीचा कोणताही प्रस्ताव नाही, असं भाजपचे नेते सांगतायत. पण युतीच होणारच नाही, हे कोणीही म्हणत नाहीय. अर्थात भाजप मनसे सोबतच्या युतीवरुन आस्ते कदम भूमिकेत आहे. भाजप-मनसे युतीचं भवितव्य हे राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरही अवलंबून असल्याची सूत्रांची माहिती आहे. मनसे अध्यक्षांनी 5 जूनला अयोध्येला जाण्याची घोषणा केलीय. भेटीत राज ठाकरेंनी मुख्यमंत्री योगींना भेटण्याची शक्यता आहे, राज ठाकरे आणि योगींची भेट झाली तर युतीची दाट शक्यता असल्याची चर्चा आहे.