Special Report | धुसफूस वाढली महाविकास आघाडी फुटणार?-TV9

| Updated on: Aug 11, 2022 | 9:43 PM

उपासभापतींना दानवेंच्या निवडीसंदर्भातलं पत्र देताना शिवसेनेनं काँग्रेसला विचारलंही नाही, हाच राग काँग्रेसच्या मनात आहे. ज्या पक्षाचे आमदार अधिक त्यांचा विरोधी पक्षनेता असंच सर्वसाधारण सूत्र आहे.

Follow us on

शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही काही नैसर्गिक आघाडी नाही, असं म्हणत काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी महाविकास आघाडी फुटण्याचेच संकेत दिलेत. म्हणजेच यापुढं महाविकास आघाडी राहणार की नाही ?, अशी चर्चा आता सुरु झालीय.  विशेष म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जे बोलले, त्याला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाणांनीही दुजोरा दिलाय. प्रदेशाध्यक्षांचा निर्णय मान्यच असेल, असं अशोक चव्हाण म्हणालेत. आता वाद महाविकास आघाडी फुटणार असे संकेत देण्यापर्यंत का आला ?…तर त्याचं टायमिंगही खास आहे. विधान परिषदेत शिवसेनेचे अंबादास दानवे विरोधी पक्षनेते झालेत आणि काँग्रेसला विधान परिषदेतलं विरोध पक्षनेतेपद हवं होतं. त्यातच उपासभापतींना दानवेंच्या निवडीसंदर्भातलं पत्र देताना शिवसेनेनं काँग्रेसला विचारलंही नाही, हाच राग काँग्रेसच्या मनात आहे. ज्या पक्षाचे आमदार अधिक त्यांचा विरोधी पक्षनेता असंच सर्वसाधारण सूत्र आहे.