ST Workers Strike : अजित पवारांचा एसटी कर्मचाऱ्यांना इशारा, एसटी कामगारांची प्रतिक्रिया काय?

| Updated on: Mar 31, 2022 | 5:33 PM

मुंबई उच्च न्यायालयाने 5 तारखेपर्यंत कोणत्याही प्रकारच्या कारवाई करता येणार नाहीत, असे निर्देश दिले आहेत. असं असताना अजित पवार यांना कोर्टाचं महत्व आणि सर्वोच्चता माहिती नसेल तर हे हास्यास्पद म्हणावं लागेल, अशी प्रतिक्रिया एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलीय.

ST Workers Strike : अजित पवारांचा एसटी कर्मचाऱ्यांना इशारा, एसटी कामगारांची प्रतिक्रिया काय?
Follow us on

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांना इशारा दिलाय. ‘एसटी महामंडळ विलीनीकरण करता येणार नाही, हे आधीच स्पष्ट झालं आहे. संपकरी कर्मचाऱ्यांकडे आज शेवटचा दिवस आहे. जर कामावर रुजू झाले नाहीतर तर उद्यापासून कडक कारवाई केली जाईल. उद्या जर वेळ मिळाली तर ज्या कर्मचाऱ्यांना बाजूला करण्यात आले आहे. त्यांच्या जागी नवीन भरती केली जाईल’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने 5 तारखेपर्यंत कोणत्याही प्रकारच्या कारवाई करता येणार नाहीत, असे निर्देश दिले आहेत. असं असताना अजित पवार यांना कोर्टाचं महत्व आणि सर्वोच्चता माहिती नसेल तर हे हास्यास्पद म्हणावं लागेल, अशी प्रतिक्रिया एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलीय.