Sunetra Pawar | अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड, विधान परिषदेत महिलांसाठी मोठ्या घोषणा
अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी आज विधानपरिषदेत आपले पहिले भाषण दिले. भाषणात त्यांनी महिला सक्षमीकरणाचा मुद्दा मांडला आणि राज्यातील महिलांच्या प्रगतीसाठी महत्त्वाच्या योजनांचा उल्लेख देखील केला. त्यांनी सांगितले की, चालू वर्ष राज्यात महिला वर्ष म्हणून साजरे केले जाईल आणि त्याअंतर्गत विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातील.
अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी आज विधानपरिषदेत आपले पहिले भाषण दिले. भाषणात त्यांनी महिला सक्षमीकरणाचा मुद्दा मांडला आणि राज्यातील महिलांच्या प्रगतीसाठी महत्त्वाच्या योजनांचा उल्लेख देखील केला. त्यांनी सांगितले की, चालू वर्ष राज्यात महिला वर्ष म्हणून साजरे केले जाईल आणि त्याअंतर्गत विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातील. नोकरी करणाऱ्या महिलांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा विचार करून ‘लवकर या, लवकर जा’ या संकल्पनेचा अवलंब केला जाईल. मुंबईतील महिला कर्मचाऱ्यांसाठी विशेष सोयी-सुविधा पुरवण्यावर सरकार भर देणार आहे. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा ‘शक्ती कायदा’ लवकरात लवकर संमत व्हावा, यासाठी शासन प्रयत्नरत असल्याचे त्यांनी सांगितले. या भाषणाच्या शेवटी, ग्रामीण संस्कृती आणि स्त्रियांच्या कष्टांचे प्रतीक असलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या ओळींचा उल्लेख करताना सुनेत्रा पवार यांचा आवाज जड झाला. अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर ही कविता आपल्या सर्वांना माहिती आहे. पण त्याचा अर्थ खूप सखोल आहे. या ओळीत स्त्रियांच्या सहनशीलतेची कष्टायची सुर्जन शक्तीची ताकद दडलेली आहे, असे सुनेत्रा पवारांनी सांगितले.
