Sunil Shetty | क्रूझवरील ड्रग्स पार्टी प्रकरणावर अभिनेता सुनिल शेट्टी नेमकं काय म्हणाला?

Sunil Shetty | क्रूझवरील ड्रग्स पार्टी प्रकरणावर अभिनेता सुनिल शेट्टी नेमकं काय म्हणाला?

| Edited By: | Updated on: Oct 03, 2021 | 3:52 PM

ड्रग्ज पार्टी प्रकरणात बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाकडून (NCB) अटक करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आज सकाळपासून माध्यमविश्वात या हायप्रोफाईल केसची चर्चा रंगली आहे.

ड्रग्ज पार्टी प्रकरणात बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाकडून (NCB) अटक करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आज सकाळपासून माध्यमविश्वात या हायप्रोफाईल केसची चर्चा रंगली आहे. एनसीबीकडून आर्यन खानची कसून चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान, आर्यन खान याला एनसीबीने ताब्यात घेतल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता त्याच्या बचावासाठी दोन वकील मुंबईच्या बॅलार्ड पियर येथील अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे सरकारी वकील अद्वैत सक्सेनाही याठिकाणी पोहोचले आहेत. त्यामुळे आता एनसीबी आर्यन खानला त्याच्या वकिलांशी बोलून देणार का थेट न्यायालयात दोन्ही पक्षांमध्ये युक्तिवाद रंगणार, हे पाहावे लागेल. एनसीबी आर्यन खानच्या कोठडीची मागणी करणार का, हे पाहावे लागेल. आर्यन खानची रवानगी न्यायालयीन कोठडीत होणार का पोलीस कोठडीत, हेदेखील पाहावे लागेल. आर्यन खानला पोलीस कोठडी सुनावली गेल्यास त्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणावर अभिनेता सुनिल शेट्टी याने माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, ‘मी सांगू इच्छितो की जिथे जिथे छापे पडतात तिथे बरेच लोक पकडले जातात आणि आम्ही असे गृहीत धरतो की या मुलाने ड्रग्जचे सेवन केले असावे किंवा या मुलाने तसे केले असावे. परंतु कार्यवाही अजूनही सुरू आहे. त्या मुलाला श्वास घेण्याची संधी द्या. नेहमी बॉलिवूडमध्ये किंवा या इंटस्ट्रीत काही घडते, तेव्हा माध्यमे प्रत्येक गोष्टीवर तुटून पडतात. त्या मुलाला थोडा वेळ द्या. सत्य बाहेर येऊ द्या. मुलांची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे.