SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 12 October 2021

| Updated on: Oct 12, 2021 | 9:45 AM

ऊस FRP च्या मुद्द्यावरुन केंद्र विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असं चित्र गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. अशावेळी भाजप नेते समरजित घाटगे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. निर्णय काहीही होऊ दे, ऊसाची एफआरपी एकरकमी देणार अशी घोषणा कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील राजर्षी शाहू महाराज साखर कारखान्याने केली आहे. 

Follow us on

महापुरामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं समरजित घाटगे यांनी सांगितलं. राज्यातील इतर साखर कारखान्यांनीही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची वेळ आली आहे. कारखानदारी पूर्णपणे सावरली आहे असं चित्र नाही. मात्र, आर्थिक ताळमेळ पाहता एकरकमी एफआरफी शक्य असल्याचंही घाटगे यांनी म्हटलंय. आम्हाला यात राजकारण आणायचं नाही. मात्र, शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायची हीच वेळ असल्याचंही घाटगे यावेळी म्हणाले.