SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 7: 30 AM | 23 June 2021

| Updated on: Jun 23, 2021 | 8:55 AM

पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणं हा तर ओबीसींवर घोर अन्याय आहे, असे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी म्हटलं आहे.

Follow us on

राज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा (OBC Political Reservation) विषय अत्यंत संवेदनशील होत असताना राज्य निवडणूक आयोगाकडून धुळे, नंदुरबार सह पाच जिल्हा परिषदा आणि ३३ पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणं हा तर ओबीसींवर घोर अन्याय आहे, असे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी म्हटलं आहे. या निर्णयाविरोधात आम्ही न्यायालयात धाव घेणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम व नागपूर या ५ जिल्हा परिषदा तसेच त्यांतर्गतच्या ३३ पंचायत समित्यांमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे, यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना पंकजाताई म्हणाल्या की, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय अत्यंत संवेदनशील होत असताना या निवडणुका जाहीर होणं हा ओबीसींवर घोर अन्याय आहे.