SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 7: 30 AM | 4 July 2021

SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 7: 30 AM | 4 July 2021

| Updated on: Jul 04, 2021 | 8:44 AM

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने पुन्हा एकदा आतापर्यंतची विक्रमी उच्चांकी कामगिरी नोंदविली. शनिवारी रात्री आठपर्यंत दिवसभरात 7 लाख 96 हजार 738 नागरिकांचे लसीकरण करून नवा विक्रम केला.

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने पुन्हा एकदा आतापर्यंतची विक्रमी उच्चांकी कामगिरी नोंदविली. रात्री आठपर्यंत दिवसभरात 7 लाख 96 हजार 738 नागरिकांचे लसीकरण करून नवा विक्रम केला. अंतिम आकडेवारी येईपर्यंत लसीकरणाची संख्या 8 लाखांवर जाईल. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणावर लस देण्याची आतापर्यंतची ही सर्वोच्च आकडेवारी आहे. राज्यात आतापर्यंत 3 कोटी 38 लाख 57 हजार 372 लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत, असे आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

लसीकरणामध्ये राज्याने केलेल्या विक्रमी कामगिरीची नोंद घेत लक्षणीय कामगिरी करणाऱ्या आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कौतुक केले आहे.

Published on: Jul 04, 2021 08:44 AM