SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 5 November 2021

| Updated on: Nov 05, 2021 | 9:34 AM

राज्यात या निमित्ताने त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, भीमाशंकर, परळी वैजनाथ, औंढा नागनाथ तसेच पंढरपूर, माहूर, कोल्हापूर, तुळजापूर येथे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड, डॉ. भारती पवार आदी सहभागी होणार आहेत, अशी माहिती भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. या ठिकाणी भजन, नाम संकीर्तन, आरती, साधू महंतांचा सत्कार असे कार्यक्रम होणार आहेत.

Follow us on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाडव्याच्या मुहूर्तावर 5 नोव्हेंबरला श्रीक्षेत्र केदारनाथ येथे श्रीमद आद्य शंकराचार्यांच्या समाधीचे आणि मूर्तीचे अनावरण होणार आहे. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते केदारनाथ धाम येथे झालेल्या 200 कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन तर 200 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजनही होणार आहे. या कार्यक्रमानिमित्ताने आद्य शंकराचार्यांनी ज्या तीर्थक्षेत्रांना पदस्पर्श केला, तसेच 12 ज्योतिर्लिंग अशा देशभरातील 82 तीर्थक्षेत्री भारतीय जनता पार्टीतर्फे देशव्यापी कार्यक्रम होणार आहेत.