VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2.30 PM | 14 October 2021

VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2.30 PM | 14 October 2021

| Edited By: | Updated on: Oct 14, 2021 | 2:54 PM

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकीनी खडसे यांना अखेर दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना तूर्तास अटक न करण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी सत्र न्यायालयाने मंदाकीनी खडसे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं होतं.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकीनी खडसे यांना अखेर दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना तूर्तास अटक न करण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी सत्र न्यायालयाने मंदाकीनी खडसे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं होतं. त्यांना अधीही अटक केलं जाण्याची शक्यता होती. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणावर न्यायालयात आज सुनावणी घेण्यात आली. यामध्ये मंदाकिनी खडसे यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. तसेच या कालावधीत त्यांनी ईडीला तपासकार्यात सहकार्य करावे असे निर्देश कोर्टाने दिले.