Shivsena Hearing | राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला… कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद ठरणार गेम चेंजर?

Shivsena Hearing | राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला… कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद ठरणार गेम चेंजर?

| Updated on: Aug 19, 2026 | 3:04 PM

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर महत्त्वाची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणाकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल न्यायालयात युक्तिवाद करत आहेत. आज त्यांचा युक्तिवाद पूर्ण होण्याची शक्यता आहे.

कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर आक्षेप घेतला. अध्यक्षांनी घेतलेले निर्णय कायद्याच्या चौकटीबाहेर असल्याचा दावा त्यांनी केला. दहाव्या परिशिष्टाचा दाखला देताना त्यांनी विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यांच्यातील फरक स्पष्ट केला. राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे होते, याची माहिती निवडणूक आयोगाकडे स्पष्टपणे नोंदवलेली होती, असेही त्यांनी सांगितले.

निवडणूक आयोगाने कोणताही विचार न करता पक्ष आणि चिन्ह दिल्याचा युक्तिवाद सिब्बल यांनी केला. यावेळी त्यांनी आमदार अपात्रता प्रकरणासोबत सुभाष देसाई प्रकरणाचाही संदर्भ दिला. शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या या सुनावणीत पुढे काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे. या निर्णयाचा राज्याच्या राजकारणावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने सुनावणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Published on: Aug 19, 2026 3:02 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us