Supriya Sule | 50 % आरक्षण मर्यादा हटवावी, सर्वांना स्वतंत्र हक्काचं आरक्षण मिळावं : सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत आरक्षणाबाबत बोलताना महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी 50 % आरक्षण मर्यादा हटवावी, सर्वांना स्वतंत्र हक्काचं आरक्षण मिळावं असंही म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत 102 व्या घटनादुरुस्तीमध्ये सुधारणा करणाऱ्या विधेयकाच्या चर्चेत भाग घेतला. यावेळी बोलताना त्यांनी आरक्षणासंबधीच्या विविध चर्चांवर भाष्य केलं. ओबीसी आरक्षणासह अनेक मुद्द्यांवर बोलताना त्यांनी 50 % आरक्षण मर्यादा हटवावी, सर्वांना स्वतंत्र हक्काचं आरक्षण मिळावं असं म्हटलं आहे.
Published on: Aug 10, 2021 03:28 PM
