Sushma Andhare : मोकार, टुकार अन् छपरी… सुषमा अंधारेंची संजय गायकवाडांवर जिव्हारी लागणारी टीका
‘उबाठाचा बापही माझी कॉपी करू शकत नाही’, असं वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाने केलेल्या आंदोलनावर बोलताना केलं होतं.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाने केलेल्या आंदोलनावर बोलताना आमदार संजय गायकवाड यांनी माझी कॉपी कुणीही करू शकत नाही मी ओरिजनल आहे, असे म्हटले होते. यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाष्य केले आहे. संजय गायकवाडांची कार्यपद्धती ती इतकी मोकार, टुकार अन् छपरी असल्याची जिव्हारी लागणारी टीका सुषमा अंधारे यांनी केली. पुढे त्या असंही म्हणाल्या की, संजय गायकवाड बरोबर बोलले छपरी चाळे, टुकारगिरी करणाऱ्यांची कॉपी कोणी करू शकणार नाही. त्यांची शाखा कुठेही नाही, असं म्हणत सुषमा अंधारेंनी खोचक टोलाही लगावला आहे. उलट त्याचं आपण कौतुक करायला हवं की त्यांच्या सारखा छपरीपणा हा त्यांच्याच ठायी आहे हे त्यांनी मान्य केलं असल्याचे सुषमा अंधारे म्हणाल्या.
Published on: Aug 12, 2025 06:21 PM
