स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक, दत्तात्रय गाडेच्या आवळल्या मुसक्या
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये का तरूणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेने राज्यभरात खळबळ माजली. अखेर या अत्याचार प्रकरणातील आरोरी दत्तात्रय गाडेला अटक करण्यात आली.
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये का तरूणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेने राज्यभरात खळबळ माजली. अखेर या अत्याचार प्रकरणातील आरोरी दत्तात्रय गाडेला अटक करण्यात आली आहे. तब्बल 70 तासांच्या शोधमोहिमेनंतर यआरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. गुनाट गावातून ग्रामस्थांच्या मदतीने, पोलिसांनी आरोपी गाडेला अटक केली आहे. एका कॅनोलमध्ये आरोपी गाडे हा लपून बसला होता. ड्रोन आणि डॉग स्क्वॉडच्या मदतीने त्याचा तपास सुरू होता. अखेर पोलिसांनीत्याला चहूबाजूंनी घेरलं आणि बाहेर येण्याची सूचना दिली. 70 तासांच्या तपासानंतर पोलिसांनी त्याला अटक करत बेड्या ठोकल्या. आरोपीला लष्कर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये आणून ठेवलं. आज पहाटे ससून रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आता थोड्याच वेळात , सकाळी 11 वाजता त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
Published on: Feb 28, 2025 08:50 AM
