Fast News | तालिबान राज संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी | 22 August 2021

Fast News | तालिबान राज संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी | 22 August 2021

| Edited By: | Updated on: Aug 22, 2021 | 6:06 PM

संपूर्ण जगात सध्या तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर अफगाणिस्तानमधील गंभीर परिस्थितीबाबत चर्चा सुरु आहे. दरम्यान या वादाचा परिणाम अफगाणिस्तानमधील सर्व क्षेत्रांवर झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानातील घडामोडींकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानमधून सैन्य माघारी बोलावल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच तालिबानने अफगाणिस्तानच्या प्रमुख शहरांवर ताबा मिळवला आहे. यामध्ये राजधानी काबूलचाही समावेश आहे. त्यामुळे  आता अफगाणिस्तानात तालिबानी राजवटीच्या नव्या अध्यायाला सुरुवात झाली आहे.

अफगाणिस्तानमध्ये तालिबानने कब्जा केल्यानंतर अनेक हेलावून टाकणारी दृष्ये समोर आलीत. यात सर्वसामान्य अफगाण नागरिकांच्या हालअपेष्टा पाहायला मिळत आहेत. तसेच अतिशय भीषण परिस्थिती संपूर्ण देशभरात पाहायला मिळत आहे. या संबधाती काही महत्त्वाच्या बातम्या ‘तालिबान राज’मध्ये…