Breaking | मेटाकुटीला आलेल्या एअर इंडियाला अखेर टाटांची ताकद, बोली जिंकली?

| Updated on: Oct 01, 2021 | 2:01 PM

‘इकॉनॉमिक टाईम्स’च्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या खरेदी प्रक्रियेतील विजेता निश्चित झाला आहे. आता केवळ घोषणेची औपचारिकता बाकी आहे. टाटा समूहाने एअर इंडियाच्या खरेदीसाठी तब्बल 5000 कोटी रुपये मोजण्याची तयारी दर्शविली आहे.

Follow us on

‘इकॉनॉमिक टाईम्स’च्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या खरेदी प्रक्रियेतील विजेता निश्चित झाला आहे. टाटा समूहाने एअर इंडियाच्या खरेदीसाठी तब्बल 5000 कोटी रुपये मोजण्याची तयारी दर्शविली आहे. एअर इंडियावरील मालकीसाठी वेगवेगळ्या चार निविदा आल्या असल्या तरी टाटा समूहाची बोली ही अग्रेसर मानली जात आहे. टाटा सन्सबरोबरीनेच, स्पाइसजेटचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग हे स्पर्धेत आहेत. एअर इंडियासाठी निर्धारित करण्यात राखीव किंमतीबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नसला तरी त्यापेक्षा जास्त किमतीवर लावली जाणारी बोली यशस्वी ठरेल. सल्लागार संस्थांकडून यशस्वी बोलीविषयी प्राथमिक चाचपणी पूर्ण झाल्यावर, त्यांच्याकडून येणारी शिफारस ही अंतिम मंजुरीसाठी मंत्रिमंडळाकडे पाठविली जाईल.