Prashant Bamb : शिक्षक म्हणतात, आम्हाला 151 प्रकारची कामं, आमदार बंब यांनी केली कामाच्या यादीची चिरफाड

Prashant Bamb : शिक्षक म्हणतात, आम्हाला 151 प्रकारची कामं, आमदार बंब यांनी केली कामाच्या यादीची चिरफाड

| Edited By: | Updated on: Aug 30, 2022 | 11:10 PM

शिक्षकांच्या विरोधात मोहीम आणखी तीव्र करण्याचा इशारा प्रशांत बंब यांनी दिला. खोट्या कामांची लिस्ट देऊन शिक्षक समाजाची फसवणूक करत असल्याचा बंब यांचा आरोप आहे.

औरंगाबाद : गंगापूरच्या आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांच्या गुणवत्तेचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. त्यानंतर शिक्षकांना तब्बल 151 प्रकारची काम करावी लागत असल्याची एक यादीच शिक्षकांनी समोर आणली होती. ही यादी समोर आणल्यानंतर प्रशांत बंब यांनी या यादीवरच आता आक्षेप घेतला आहे. प्रशांत बंब यांनी ही यादीच बोगस असल्याचं सांगितलं आहे. विशेष म्हणजे शिक्षकांना कराव्या लागणाऱ्या 151 कामाच्या यादीची बंब यांनी अक्षरशः चिरफाड केलेली आहे. शिक्षक माझ्याविरोधात मोर्चे काढत आहेत. मात्र मी आता थांबणार नाही, असाही इशारा बंब यांनी दिलाय. शिक्षकांच्या विरोधात मोहीम आणखी तीव्र करण्याचा इशारा प्रशांत बंब यांनी दिला. खोट्या कामांची लिस्ट देऊन शिक्षक समाजाची फसवणूक करत असल्याचा बंब यांचा आरोप आहे.

Published on: Aug 30, 2022 11:10 PM