Tejas Thackeray Birthday Banner | तेजस ठाकरें यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीबाहेर बॅनरबाजी

Tejas Thackeray Birthday Banner | तेजस ठाकरें यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीबाहेर बॅनरबाजी

| Edited By: | Updated on: Aug 07, 2022 | 9:42 AM

शिवसेनेतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील बंडखोरीनंतर पुन्हा एकदा मोठ्या फेरबदलाची शक्यता वर्तवली जात आहे. आदित्य ठाकरे यांना शिवसेनेचे कार्याध्यक्ष केले जाऊ शकते आणि त्यांचे बंधू तेजस ठाकरे यांना सक्रिय राजकारणात उतरवण्याची भूमिका तयार केली जात आहे.

शिवसेनेतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील बंडखोरीनंतर पुन्हा एकदा मोठ्या फेरबदलाची शक्यता वर्तवली जात आहे. आदित्य ठाकरे यांना शिवसेनेचे कार्याध्यक्ष केले जाऊ शकते आणि त्यांचे बंधू तेजस ठाकरे यांना सक्रिय राजकारणात उतरवण्याची भूमिका तयार केली जात आहे. तेजस ठाकरे यांच्या हाती शिवसेनेच्या युवा सेनेची कमान दिली जाऊ शकते. सध्या शिवसेनेतील उद्धव गट आपल्या पक्षाचे अस्तित्व वाचवण्यासाठी लढत आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रभर दौरा करून आदित्य ठाकरे मुंबईत परतले आहेत. तसेच आज तेजस ठाकरे यांचा वाढदिवस असल्याने शिवसेनेतील कार्यकर्त्यांनी त्यांचे बॅनर लावले आहेत.

Published on: Aug 07, 2022 09:42 AM