Osmanabad | उस्मानाबादमधील तेर गाव पाण्याखाली, ड्रोनची दृश्य tv9वर

Osmanabad | उस्मानाबादमधील तेर गाव पाण्याखाली, ड्रोनची दृश्य tv9वर

| Edited By: | Updated on: Sep 28, 2021 | 3:30 PM

उस्मानाबाद जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तेर ढोकी कळंब या भागात ढगफुटी झाली आहे. शेतात 4 ते 5 फूटपाणी असून सरकारने पंचनामे न करता थेट मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात तेर ढोकी या भागात ढगफुटी झाली आहे. नदी नाले तुडुंब वाहत असून तेरणा नदीला पूर आला आहे. तेरणा धरण फुल्ल झाले असून सर्व दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामुळे तेर या गावासह तेरणा नदी काठी असलेल्या इर्ला दाऊतपूर येथे पाणी गावात शिरले आहे. तेरणा धरण भरले असून या धरणातुन वाहणारे पाणी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येत आहेत, तेरणा या धरणची व आसपासच्या गावात पावसाने पाणीच पाणी झाले असून या धरणाची व पावसाची दृश्य टीव्ही 9 च्या खास प्रेक्षकांसाठी आम्ही दाखवीत आहोत. ड्रोनच्या माध्यमातून या भागात पावसाने घातलेल्या थैमान दिसून येत. उस्मानाबाद जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तेर ढोकी कळंब या भागात ढगफुटी झाली आहे. शेतात 4 ते 5 फूटपाणी असून सरकारने पंचनामे न करता थेट मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.