Thackeray : बाळासाहेबांचं स्वप्न साकार झालं? 20 वर्षानंतर पहिल्यांदाच असं घडलं, VIDEO पाहून तुम्ही म्हणाल…

Thackeray : बाळासाहेबांचं स्वप्न साकार झालं? 20 वर्षानंतर पहिल्यांदाच असं घडलं, VIDEO पाहून तुम्ही म्हणाल…

| Updated on: Jul 05, 2025 | 1:58 PM

20 वर्षानंतर पहिल्यांदाच ठाकरे बंधू एकाच मंचावर एकत्रित आले. दोघांनी एकमेकांना मान-सन्मान दिला. दोघे एकत्र असल्याची ही एक फ्रेम... हे चित्र पाहून आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना नक्कीच आनंद झाला असता

संपूर्ण ठाकरे कुंटुंब विजयी मेळाव्याला उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. विशेषतः ठाकरेंची तिसरी पिढी देखील हजर होती. यामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, अमित ठाकरे, शर्मिला ठाकरे यांनी एकत्र येत एकाच फ्रेममध्ये फोटोसेशन केल्याचे दिसून आले. आज राज्य सरकारने त्रिभाषा सूत्रातील हिंदी भाषेच्या सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर दोघे ठाकरे बंधू एकत्र आले. तब्बल १८ ते २० वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या मेळाव्याच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर एकत्र विराजमान झाले होते. यावेळी भाषणातून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांना मान दिल्याचेही दिसून आले. हाच तो क्षण याची देही याची डोळा बघण्यासाठी तमाम मराठी बांधव आणि शिवसैनिक वरळी डोम येथे आज एकवटा होता. कित्येक वर्षानंतर पहिल्यांदाच असं घडलं दोघे ठाकरे बंधू एकत्र येण्याचं चित्र पाहून बाळासाहेबांना आनंद झाला असता.

Published on: Jul 05, 2025 01:57 PM