Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा; काय आहे कार्यक्रमाची रुपरेषा?
Thackeray Brothers Vijay Melava : ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा येत्या 5 जुलैला होत आहे. या कार्यक्रमाची रूपरेषा आता समोर आली आहे.
ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा येत्या 5 जुलैला होत आहे. या कार्यक्रमाची रूपरेषा आता समोर आली आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, जयंत पाटील, हर्षवर्धन सपकाळ हे व्यासपीठावर असणार आहेत. वरळी डोममध्ये जवळपास 7 ते 8 हजार लोक बसण्याची व्यवस्था आहे. हॉलमध्ये, हॉलच्या बाहेर आणि रस्त्यावर देखील एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत. या विजयी मेळाव्याच्या व्यासपीठावर मुख्य आकर्षण हे दोन्ही ठाकरे बंधु असणार आहेत.
ठाकरेंच्या सेनेची आणि मनसेची विजयी मेळाव्याची तयारी जोरात सुरू आहे. वरळी डोममध्ये होणाऱ्या या मेळाव्याची नियोजनबद्ध तयारी करण्याची जबाबदारी दोन्ही पक्षांच्या नेत्यांवर आहे. मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन देखील दोन्ही पक्षांकडून केलं जात आहे.
Published on: Jul 03, 2025 05:28 PM
