ST Workers Strike | एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईची ठाकरे सरकारची तयारी ?

ST Workers Strike | एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईची ठाकरे सरकारची तयारी ?

| Edited By: | Updated on: Dec 16, 2021 | 8:50 PM

मेस्मा लावण्याबाबत उद्याच्या बैठकीनंतर निर्णय होऊ शकतो. तसेच, याबाबत वेगवेगळ्या पर्यायांवर विचार सुरू असून आमचं दायित्व जसं कर्मचाऱ्यांशी तसं ते जनतेशी देखील असल्याचं परब यांनी यावेळी म्हटलं आहे.

रत्नागिरी : एसटीचा संप अद्याप देखील सुरू आहे. दरम्यान, याबाबत बोलताना रत्नागिरी येथे दौऱ्यावर आलेल्या परिवहन मंत्री अनिल परब यांनी महत्वाची माहिती दिली आहे. सरकार हातावर हात ठेवून गप्प बसणार नाही. मेस्मा लावण्याबाबत उद्याच्या बैठकीनंतर निर्णय होऊ शकतो. तसेच, याबाबत वेगवेगळ्या पर्यायांवर विचार सुरू असून आमचं दायित्व जसं कर्मचाऱ्यांशी तसं ते जनतेशी देखील असल्याचं परब यांनी यावेळी म्हटलं आहे. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांची यावेळी दिशाभूल केली जात असल्याचं देखील यावेळी परब यांनी म्हणत सदावर्ते यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टिका केली आहे.