Bhaskar Jadhav : उदय सामंतांच्या ‘त्या’ ऑफरवर भास्कर जाधव स्पष्टच म्हणाले, मी त्यांचा द्वेष…

Bhaskar Jadhav : उदय सामंतांच्या ‘त्या’ ऑफरवर भास्कर जाधव स्पष्टच म्हणाले, मी त्यांचा द्वेष…

| Updated on: Jun 24, 2025 | 2:48 PM

मनसे नेते संदीप देशपांडे यांची भास्कर जाधव यांच्याविषयीची एक पोस्ट चर्चेत आली आहे. 'महाराष्ट्राच्या मनातलं ओळखणाऱ्यांनी भास्कर जाधव यांच्या मनातलं ओळखलं का?' असा सवाल त्यांनी केला आहे. यावर काय म्हणाले भास्कर जाधव? बघा

भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारलं तर आनंदच होईल, त्यांनी राजकीय संन्यास घेऊ नये, त्यांच्या अनुभवाचा महाराष्ट्राला फायदा होईल, असं म्हणत शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटात असणाऱ्या भास्कर जाधव यांनी ऑफर दिल्याचे पाहायला मिळत आहे.  दरम्यान, भास्कर जाधव यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. उदय सामंत यांनी सद्भावना व्यक्त केली असेल तर चांगलंच आहे, असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलं.

पुढे ते असेही म्हणाले, ‘उदय सामंत यांनी सद्भावना व्यक्त केली असेल तर आनंदच आहे. अशाप्रकारेच आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात वेगवेगळ्या विचारांनी आणि वेगवेगळ्या पक्षात जरी काम करत असलो तरी एकमेकांचा एकमेकांना आणि जिल्ह्याच्या विकासाला फायदा होत असेल तर सहानुभूती ठेवली पाहिजे’, असं मत भास्कर जाधव यांनी व्यक्त केलं. उदय सामंत यांना वेगवेगळी मंत्रिपदं मिळाली पण मी त्यांचा कधीही द्वेष केला नाही. तो त्यांच्या नशिबाचा भाग आहे. किंवा ती त्यांनी कशी मिळवली हे त्यांचं कौशल्य असेल पण त्यांनी माझ्याबद्दल चांगले विचार व्यक्त केले असतील तर चांगलंच आहे, असंही भास्कर जाधव म्हणाले.

Published on: Jun 24, 2025 02:46 PM