असं खोटं बोलणाऱ्या पंतप्रधान मोदींवर कोण विश्वास ठेवणार? संजय राऊत यांचा हल्लाबोल
देशाच्या पंतप्रधानांनी खोट बोलू नये, त्यांनी आपली आधीची विधान आठवावीत, असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. मोदींनी हेही सांगितलं होतं की शरद पवारांचा हात धरून मी राजकारणात आलो. शरद पवार माझे राजकीय गुरू असंही मोदी म्हणाले होते.
मुंबई, २९ फेब्रुवारी २०२४ : शरद पवार या देशाचे उत्तम कृषीमंत्री होते. यूपीए सरकारमध्ये नरेंद्र मोदींबाबत वेगळी भूमिका घेतली गेली होती, तेव्हा कृषीमंत्री शरद पवार हेच नरेंद्र मोदींना गुजरातच्या कृषी-सहकाराबाबत आवर्जून मदत करत होते. पण आता पंतप्रधान खोटं बोलत आहे. खरंतर देशाच्या पंतप्रधानांनी खोट बोलू नये, त्यांनी आपली आधीची विधान आठवावीत, असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. मोदींनी हेही सांगितलं होतं की शरद पवारांचा हात धरून मी राजकारणात आलो. शरद पवार माझे राजकीय गुरू असंही मोदी म्हणाले होते. दरम्यान, महाराष्ट्रातील किंवा देशातील सगळ्यात मोठा घोटाळा म्हणजे आदर्श घोटाळा असं मोदी म्हणाले होते. त्याच घोटाळ्याच्या सूत्रधाराला त्यांनी भाजपात घेतलं आणि राज्यसभेची उमेदावारीही दिली. सिंचन घोटाळा करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही असं मोदी म्हणाले होते मात्र त्यांनी अजित पवारांना आपल्याच पक्षात घेतलं आणि उपमुख्यमंत्री केलं. त्यामुळे मोदींच्या विधानांवर विश्वास ठेवावा अशी मानसिकता आता जनतेत नाही. ते खोटं बोलतात, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी मोदींवर केली.
