अचानक नाही, आधीपासूनच तयारी; थेट… ठाकरे गटातील फुटीबाबत विश्लेषकांचा मोठा दावा

अचानक नाही, आधीपासूनच तयारी; थेट… ठाकरे गटातील फुटीबाबत विश्लेषकांचा मोठा दावा

| Updated on: Jun 15, 2026 | 4:13 PM

राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. असंच काही महारष्ट्राच्या राजकारणात घडत आहे. याठिकाणी ठाकरेंच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. अलीकडे ठाकरे यांच्या पक्षाचे काही खासदार फोडण्याचा प्रयत्न केला जातोय, असे म्हटले जात आहे

राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. असंच काही महारष्ट्राच्या राजकारणात घडत आहे. याठिकाणी ठाकरेंच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. अलीकडे ठाकरे यांच्या पक्षाचे काही खासदार फोडण्याचा प्रयत्न केला जातोय, असे म्हटले जात आहे. दरम्यान आता ठाकरेंच्या याच खासदारांबाबत मोठी आणि खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे. ठाकरेंचे खासदार फुटण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात असून काही खासदार वेगळा गट स्थापन करू शकतात, असे सांगितले जात आहे. लवकरच हे नेते लोकसभा अध्यक्षाकडे पत्र देणार आहेत अशी चर्चा आहे. याच कारणास्तव संजय राऊत दिल्लीला रवाना झाल्याचंही कळत आहे.

याप्रकरणाबाबत जेष्ठ पत्रकार आणि विश्लेषक संजीव उन्हाळे यांनी हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का ठरु शकतो असं सांगितलं आहे. पुढे ते म्हणाले, *’सत्ताधारी पक्षाला महिला विधेयक मंजूर करून घेण्यासाठी ६८ खासदार गरजेते होते. त्यमुळे त्यासाठीच ही तोडजोड सुरु आहे. या प्रकरणी आधीसाठीच तयारी सुरु होती मात्र एक-दोन खासदार पक्षांतर करतील हे कायद्याच्या दृष्टीने योग्य ठरलं नसतं त्यामुले पाच ते सहा खासदार पक्षांतर करणे गरजेचे होते.’*

Published on: Jun 15, 2026 4:12 PM
Follow Us