प्रताप सरनाईक यांची ७ कोटी ६६ लाखांची फसवणूक, आमदाराला कुणी गंडवलं? नेमकं घडलं काय?

| Updated on: Jul 28, 2023 | 4:36 PM

VIDEO | शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक मोठ्या अडचणीत, तब्बल 7 कोटी 66 लाख रुपयांची फसवणूक

Follow us on

ठाणे, 28 जुलै 2023 | शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक मोठ्या अडचणीत सापडले आहे. सरनाईक यांची तब्बल साडेसात कोटीहून अधिक रकमेची त्यांची फसवणूक करण्यात आली आहे. आमदार प्रताप सरनाईक यांची तब्बल 7 कोटी 66 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हे प्रकरण 2021चं आहे. प्रताप सरनाईक यांना घोडबंदर रोडवरील एका जमिनीचा व्यवहार करायचा होता. त्यांनी जमीन खरेदी करण्यासाठी मालाडमधील एका व्यक्तीला संपर्क साधला होता. मार्टीन बर्नार्डो, कोरिया असं या व्यक्तीचं नाव आहे. सरनाईक यांनी या व्यक्तीला या जमिनीचा व्यवहार करण्यासाठी पहिल्या टप्प्यासाठी साडे तीन कोटी रुपये दिले. बँकेचा व्यवहारही झाला होता. मात्र, एवढी मोठी रक्कम मिळाल्यानंतरही त्या व्यक्तीने घोडबंदर रोडवरच्या जमिनीचे पेपर सरनाईक यांच्या नावावर केले नाहीत. सरनाईक यांना पैसेही दिले नसल्याने सरनाईक चांगलेच आक्रमक झाले.