Kolhapur Panchganga River | पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर, नदीची पाणी पातळी पोहोचली तीस फुटांवर

| Updated on: Jul 06, 2022 | 11:06 AM

गेल्या दोन दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी तीस फुटांवर पोहोचली आहे. पंचगंगा नदी दुथडी भरून वाहत असून आता नदीचे पाणी पात्रा बाहेर पडल आहे.

Follow us on

गेल्या दोन दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी तीस फुटांवर पोहोचली आहे. पंचगंगा नदी दुथडी भरून वाहत असून आता नदीचे पाणी पात्रा बाहेर पडल आहे. नदीच्या आजूबाजूची शेती आता पाण्याखाली जायला सुरवात झाली आहे. काल दिवसभरात या पाणी पातळीत सहा फुटांनी वाढ झाली आहे. पहाटेपासून कोल्हापूर शहर आणि परिसरात पावसानं काहीशी उसंत घेतली असली तरी धरण क्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. पुढचे दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिलाय. त्यामुळे पावसाचं प्रमाण कायम राहिल्यास कोल्हापूरला पुन्हा एकदा पूर परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो.