पारनेरमध्ये मळगंगा देवीच्या यात्रेचा जल्लोष, बघा कसा आहे भक्तांचा उत्साह
VIDEO | अहमदनगरमधील पारनेर तालुक्यातील निघोज येथे मळगंगा देवीच्या यात्रेनिमित्ताने हजारो भक्तांनी लावली हजेरी
अहमदनगर : अहमदनगरला पारनेर तालुक्यातील निघोज येथे मळगंगा देवीच्या यात्रेनिमित्ताने हजारो भक्तांनी हजेरी लावली. यावेळी कुंडातून निघालेल्या घागरीची मोठ्या उत्साहात गावातून मिरवणूक काढण्यात आल्याचे पाहायला मिळाले. या यात्रेत खोबरं-भंडाऱ्याची मोठ्या प्रमाणात भक्तगण उधळण करतांना दिसतात. १० दिवस चालणाऱ्या यात्रेस देश विदेशातून लाखो भाविक हजेरी लावत असतात. भक्तांच्या नवसाला पावणारी आणि संकटात आधार देणारी शितल रुप म्हणून मळगंगा देवीची ख्याती सर्वश्रुत असल्याचे सांगितले जाते. यात्रेच्या सातव्या दिवशी आंबील आणि बगडगाड्याच्या दिवशी सर्व मळगंगा देवीच्या उंब्रज , धोलवड, चिंचोली, करंदी, बेलापुर, मांजरी येथील लहान सहा बहिणी निघोजच्या लहान मळगंगा देवीला भेटण्यासाठी येतात. आंबीलच्या दिवशी रात्री निघणाऱ्या मोठ्या बहिणीच्या मानाच्या पालख्या आणि काठी अशा आतषबाजीच्या भव्य मिरवणूकीत सहभागी होतात.
