Shetkari Andolan | हजारो आदिवासी व शेतकऱ्यांचे ‘लाल वादळ’ मंत्रालयाच्या दिशेने

Shetkari Andolan | हजारो आदिवासी व शेतकऱ्यांचे ‘लाल वादळ’ मंत्रालयाच्या दिशेने

| Updated on: Jan 25, 2026 | 1:41 PM

किसान सभा आणि मापकचे शेतकरी शेतमजुरांचा लाँग मार्च थेट मुंबईच्या दिशेने निघाला आहे. माजी आमदार जे. पी. गावीत्यांच्या नेतृत्वात मुंबईच्या दिशेने लाल वादळ कूच करत आहे. हातात लाल झेंडे, पायी चालत, राज्यसरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत हे वादळ मुंबईकडे येण्यास निघालं आहे.

नाशिक जिल्ह्यातील हजारो आदिवासी आणि शेतकऱ्यांकडून विविध प्रलंबित मागण्यांसाठी लाँग मार्च मोर्चा काढण्यात आला होता. दिंडोरीच्या तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन सुरु होतं, मात्र मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. म्हणून थेट मंत्रालयावर धडकण्याची भूमिका ह्या मोर्चाने घेतली आहे. किसान सभा आणि मापकचे शेतकरी शेतमजुरांचा लाँग मार्च थेट मुंबईच्या दिशेने निघाला आहे. माजी आमदार जे. पी. गावीत्यांच्या नेतृत्वात मुंबईच्या दिशेने लाल वादळ कूच करत आहे. हातात लाल झेंडे, पायी चालत, राज्यसरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत हे वादळ मुंबईकडे येण्यास निघालं आहे.

Published on: Jan 25, 2026 01:41 PM