Loksabha Election : मुंबईत भाजपचं धक्कातंत्र, ‘या’ तीन विद्यमान खासदारांना मिळणार डच्चू?

Loksabha Election : मुंबईत भाजपचं धक्कातंत्र, ‘या’ तीन विद्यमान खासदारांना मिळणार डच्चू?

| Updated on: Mar 13, 2024 | 3:09 PM

मुंबईतील तीन विद्यमान खासदारांना डच्चू मिळण्याची शक्यता... पूनम महाजन, गोपाळ शेट्टी आणि मनोज कोटक यांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा आहे. मुंबईमध्ये भाजप पाचही जागा लढवणार आहे तर ठाण्याची एक जागा ही शिंदे गटाला देण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

मुंबई, १३ मार्च २०२४ : मुंबईमध्ये भाजपचं धक्कातंत्र पाहायला मिळत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील तीन विद्यमान खासदारांना डच्चू मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पूनम महाजन, गोपाळ शेट्टी आणि मनोज कोटक यांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा आहे. मुंबईमध्ये भाजप पाचही जागा लढवणार आहे तर ठाण्याची एक जागा ही शिंदे गटाला देण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकर यांचा मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघ हा आता भाजपकडे येण्याची शक्यता आहे. तर ठाण्यातील एक जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाच्या पदरात पाडून घेतली आहे. उत्तर पश्चिम मुंबईतून भाजप आमदार अमित साटम यांना खासदारकीचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे. यासह उत्तर मध्य मुंबईत पूनम महाजन यांच्याऐवजी आशिष शेलार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. उत्तर मुंबईत गोपाळ शेट्टींऐवजी पियुष गोयल यांच्या नावाला पसंती मिळतेय. ईशान्य मुंबईतून मनोज कोटक यांच्याजागी आमदार पराग शहा यांच्या नावाची चर्चा आहे.

Published on: Mar 13, 2024 03:09 PM