TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 7 AM | 26 November 2021

TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 7 AM | 26 November 2021

| Edited By: | Updated on: Nov 26, 2021 | 10:47 AM

एसटी महामंडळाची वसईत आज पहिली बस धावली आहे. वसई बस आगारातून सकाळी साडे सातच्या  सुमारास निघालेली बस 8 वाजता वसई रोड नवघर बस आगारात पोहचली आहे. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण या मागणीसाठी संपूर्ण राज्यात कर्मचारी यांचा संप सुरू आहे. दोन दिवसांपासून संपकरी आणि राज्यसरकार मध्ये चर्चा सुरू आहेत. कर्मचाऱ्याची वेतनवाढ झाली आहे.

एसटी महामंडळाची वसईत आज पहिली बस धावली आहे. वसई बस आगारातून सकाळी साडे सातच्या  सुमारास निघालेली बस 8 वाजता वसई रोड नवघर बस आगारात पोहचली आहे. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण या मागणीसाठी संपूर्ण राज्यात कर्मचारी यांचा संप सुरू आहे. दोन दिवसांपासून संपकरी आणि राज्यसरकार मध्ये चर्चा सुरू आहेत. कर्मचाऱ्याची वेतनवाढ झाली आहे. पण विलीनीकरण चा मुद्दा प्रलंबित असल्याने अनेक संपकरी कामावर हजर होण्यास तयार नाहीत. पण आज एक बस वसईत धावल्याने प्रवाशानी आनंद व्यक्त केला आहे. ज्या प्रमाणे वसईत बस धावली तशीच आता वसईच्या ग्रामीण भागात ही बस सेवा सुरू करावी अशी मागणी होत आहे..