Mulund | मुलुंडमध्ये वाहतूक पोलिसांकडून खड्डे बुजवण्याचं काम

| Updated on: Jul 20, 2021 | 4:22 PM

पावसामुळे मुंबईच्या रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम खरतर पालिका प्रशासनाचा आहे परंतु या धोकादायक खड्ड्यांमुळे कोणाचा जीव जाऊ नये आणि वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी आता वाहतूक पोलिसांनाच त्यांचं वाहतुकीचे नियंत्रण करण्याचे काम सोडून खड्डे बुजविण्याचे काम करावं लागत आहे.

Follow us on
पावसामुळे मुंबईच्या रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम खरतर पालिका प्रशासनाचा आहे परंतु या धोकादायक खड्ड्यांमुळे कोणाचा जीव जाऊ नये आणि वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी आता वाहतूक पोलिसांनाच त्यांचं वाहतुकीचे नियंत्रण करण्याचे काम सोडून खड्डे बुजविण्याचे काम करावं लागत आहे. मुलुंड चेक नाका परिसरात रस्त्यावर पडलेले खड्डे आता वाहतूक पोलिसांनी बुझवायला ला घेतले आहेत गेल्या आठवडाभरापासून या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले होते त्यामुळे अपघात होण्याच्या शक्यता तर होत्याच सोबतच वाहतुकीची कोंडी देखील होत होती अखेर वाहतूक पोलिसांनीच आज सकाळी हे खड्डे माती टाकून बुजवायला घेतले. हे खड्डे वाहतूक पोलिसांनी बुजवून तात्पुरती मलमपट्टी तर केली आहेच परंतु कायमस्वरूपी हे खड्डे बुजवायला पालिकेला मुहूर्त कधी मिळणार आहे हा एक सवाल आहे.