ठरलं? मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला, कोण कुठं लढणार? टिव्ही ९ वर EXCLUSIVE रिपोर्ट

ठरलं? मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला, कोण कुठं लढणार? टिव्ही ९ वर EXCLUSIVE रिपोर्ट

| Updated on: Mar 01, 2024 | 11:41 AM

शिवसेना ठाकरे गट 48 पैकी 23 जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर 23 पैकी दोन जागा मित्र पक्षांना देण्याची ठाकरे गटाची तयारी आहे. तर काँग्रेसच्या वाटेला 15 ते 17 जागा मिळणार.... मविआचं जागावाटप सर्वात आधी 'tv9 मराठीवर' , पाहा ग्राफिक्सच्या माध्यमातून

मुंबई, १ मार्च २०२४ : लोकसभा निवडणुकीकरता महाविकास आघाडीचा होत असलेल्या बैठकीचा सिलसिला आता संपलेला आहे. आता ४८ जागांवर कोण कुठे लढणार हे देखील ठरलेले आहे. मविआने अद्याप घोषणा केली नसली तरी सूत्रांकडून मविआच्या फॉर्म्युल्याची माहिती मिळाली आहे. मविआच्या जागावाटपाच्या फॉर्म्युला निश्चित झाला असून शरद पवार यांच्या सिल्व्हर ओकवर पुन्हा एक बैठक झाली. यामध्ये शरद पवार यांच्यासह संजय राऊत आणि नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यात चर्चा झाली. मविआकडून कोणताही फॉर्म्युला समोर आला नसला तरी टिव्ही ९ कडे एक्सक्लुझिव्ह माहिती आहे. शिवसेना ठाकरे गट 48 पैकी 23 जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर 23 पैकी दोन जागा मित्र पक्षांना देण्याची ठाकरे गटाची तयारी आहे. तर काँग्रेसच्या वाटेला 15 ते 17 जागा मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला 9 ते 11 जागा मिळणार आहेत. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

Published on: Mar 01, 2024 11:41 AM