Ambadas Danve : शिंदेंचं कुणी ऐकेना… शिवसेनेच्या मंत्र्यांचा बॉस फडणवीस… दावनेंची जिव्हारी लागणारी टीका, बावनकुळे म्हणाले…

Ambadas Danve : शिंदेंचं कुणी ऐकेना… शिवसेनेच्या मंत्र्यांचा बॉस फडणवीस… दावनेंची जिव्हारी लागणारी टीका, बावनकुळे म्हणाले…

| Updated on: Nov 19, 2025 | 5:53 PM

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर आणि महायुतीवर भाष्य करत जोरदार हल्लाबोल केला आहे. तर दानवेंच्या टीकेवर भाजपकडूनही उत्तर देण्यात आलंय.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी महायुतीवर टीका करताना, शिंदे गटाचे मंत्री एकनाथ शिंदे यांचे ऐकत नसून त्यांचे बॉस देवेंद्र फडणवीस झाले आहेत, असे म्हटले. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी दानवेंना प्रत्युत्तर देत, महायुतीत मिठाचा खडा टाकून काहीही साध्य होणार नाही, असे म्हटले. बावनकुळे यांनी महायुतीचे मंत्री एकत्रितपणे काम करत असल्याचे स्पष्ट केले. तर काँग्रसेचे हर्षवर्धन सपकाळ यांनी सध्याच्या सरकारला “गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार” असे संबोधत, त्यांच्यात टोळीयुद्ध सुरू असल्याचे म्हटले. अशा परिस्थितीत नेत्यांनी सत्तेतून बाहेर पडावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Published on: Nov 19, 2025 05:49 PM