अजित पवार गटामध्ये नाराजी? रोहित पवार यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर उदय सामंत यांचं खोचक भाष्य

अजित पवार गटामध्ये नाराजी? रोहित पवार यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर उदय सामंत यांचं खोचक भाष्य

| Updated on: Nov 13, 2023 | 11:59 PM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अजित पवार यांच्यात झालेल्या भेटीनंतर रोहित पवार यांनी हा दावा केलाय. यावर शिवसेना मंत्री उदय सामंत यांनी भाष्य केले आहे. अजितदादांससोबत सुप्रिया सुळे राजकीय प्रवाहात नाहीत, उदय सामंत यांचं नेमकं भाष्य काय?

मुंबई, १३ नोव्हेंबर २०२३ | भाजप ठरल्याप्रमाणे वागत नसल्याने अजित पवार गटामध्ये नाराजी असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अजित पवार यांच्यात झालेल्या भेटीनंतर रोहित पवार यांनी हा दावा केलाय. यावर शिवसेना मंत्री उदय सामंत यांनी भाष्य केले आहे. उदय सामंत म्हणाले, अजितदादांससोबत सुप्रिया सुळे राजकीय प्रवाहात नाहीत, त्यामुळे त्यांना अजित दादांच्या गटातील नाराजीबद्दल माहित नाही, असं उदय सामंत यांनी म्हटले आहे. तर दिवाळीमध्ये सगळेच मनोरंजन करतात तसा रोहित पवार यांनी केलंय. रोहित पवार यांनी दिवाळीनिमित्त नवीन भविष्यवाणी केली असल्याची खोचक टीका देखील उदय सामंत यांनी केली. सरकार जाणार असं म्हणत काहींनी ३१ डिसेंबर तारीख दिली तर काहींनी २४ डिसेंबर दिली, यामध्ये रोहित पवार यांचा समावेश झाल्याचे म्हणत उदय सामंत यांनी खोचक शुभेच्छा दिल्यात.

Published on: Nov 13, 2023 11:58 PM