Uday Samant : ‘ती’ अट म्हणजे राज ठाकरेंना कमी लेखणं, मला नाही वाटत…., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा

Uday Samant : ‘ती’ अट म्हणजे राज ठाकरेंना कमी लेखणं, मला नाही वाटत…., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा

| Updated on: Apr 19, 2025 | 5:04 PM

राज ठाकरेंनी व्यक्त केलेल्या युतीच्या भूमिकेनंतर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मनसेसोबत युती करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. ‘मी सुद्धा भांडण बाजूला ठेवायला तयार आहे’, असं म्हणत त्यांनी एकअट ठेवली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याच्या मुद्यावर बोलताना एकत्र येणं, एकत्र राहणं, यात कठीण गोष्ट आहे, असं मला वाटत नाही. पण विषय फक्त इच्छेचा आहे, असं म्हणाले. महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या एका मुलाखतीत राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलं. यानंतर राजकीय वर्तुळात राज-उद्धव एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. अशातच ‘अटी-शर्तींवर एकत्र येण्याची साद घालणं म्हणजे राज ठाकरेंना कमी लेखणं असं आहे’, अशी प्रतिक्रिया देत शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. तर कोणाच्या अटी मान्य करून युती करण्याइतके राज ठाकरे हे छोटे व्यक्तिमत्त्व नाही, असं उदय सामंत म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी घातलेल्या अटीवर बोलताना उदय सामंत म्हणाले, राज ठाकरे यांचं नेतृत्व हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह महाराष्ट्राने मान्य केलं आहे. राज ठाकरे हे स्वतःचा स्वतंत्र पक्ष चालवतात, त्यामुळे त्यांना अट घालून त्यांना सोबत घेणं इतकं ते लहान नेतृत्व नाही. तर राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंनी जी अट घातली ती कमी लेखण्यासाठी टाकली आहे. पण राज ठाकरे एवढे कमकुवत नाहीत की ते अशी अट मान्य करून कोणाबरोबर जातील, असं स्पष्टपणे उदय सामंत म्हणाले.

Published on: Apr 19, 2025 05:04 PM