Raj-Uddhav Thackeray Vijay Melava LIVE : महाराष्ट्राच्या मराठी माणसाची स्वप्नपूर्ती; ठाकरे बंधूं एकत्र!
Uddhav, Raj Thackeray Victory Rally LIVE Updates in Marathi : आख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेला क्षण आज आलेला असून वरळी डोम येथे ठाकरे बंधु एकाच मंचावर एकत्र बघायला मिळाले आहेत.
संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेला ऐतिहासिक क्षण अखेर आज 18 वर्षांनी आला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मराठी भाषेच्या मुद्द्यावर एकत्र आलेले आहेत. वरळी डोम येथे हिंदी सक्तीचा जीआर रद्द झाल्यानंतर ठाकरे बंधूंकडून एकत्रित विजयी मेळावा घेण्यात येत आहे. या मेळव्यात आज ठाकरे बंधु एकत्र आलेले असल्याने यासाठी मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केलेली आहे.
कार्यकर्त्यांच्या घोषणांनी वरळी डोमचा परिसर दुमदुमून गेलेला यावेळी बघायला मिळाला आहे. 18 ते 20 वर्षानंतर त्यांचे कार्यकते एकमेकांना भेटताना एक वेगळा आनंद दिसत आहे. तर सत्ताधाऱ्यांकडून या मेळाव्यावर टीका केली जात आहे. आता याच मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधु आज युतीची घोषणा करतील का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Published on: Jul 05, 2025 12:15 PM
