Udhav Thackeray LIVE : आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही, पण.. ; हिंदी सक्तीवर उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका
Udhav Thackeray Press Conference LIVE : राज्यात हिंदी सक्तीचा मुद्दा तापलेला असून त्यावर आज उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली आहे.
आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही, कोणत्याही भाषेचा द्वेष करत नाही. पण याचा अर्थ कोणतीही भाषा आमच्यावर सक्तीने लादून घेणार नाही, असं उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं आहे. आज उद्धव ठाकरे यांनी हिंदी भाषेच्या सक्तीवर पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना उद्धव ठाकरेंनी म्हंटलं की, कोणत्याही राजकीय कारणासाठी पत्रकार परिषद नाही. आपल्याच घरात मातृभाषेच्या लढ्यासाठी आहे. कारण नसताना हिंदीची सक्ती हा विषय जो काही महाराष्ट्रद्रोही सरकारकडून लादला जात आहे. त्याला विरोधी करण्यासाठी सर्व मराठी माणसं पक्षीय भेदाभेद विसरून एकत्र आली पाहिजे. शिवसेनेचा जन्मच मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाविरोधात लढण्यासाठी झाला आहे. आता समजलं असेल यांना शिवसेना का संपवायची आहे. कारण यांना महाराष्ट्रावर हुकूमशाही लादायची आहे. आम्ही दीपक पवार यांच्या सोबत आहोत. मराठी भाषिक आणि मराठी भाषेचे पुत्र म्हणून शिवसेना त्यात सहभागी होणार असल्याचं देखील यावेळी ठाकरेंनी सांगितलं.
