Thackeray Brothers :  हम दोनो भाई… उद्धव ठाकरे युतीवर स्पष्टच म्हणाले… दोघात तिसरा नको मग मविआचं काय होणार?

Thackeray Brothers : हम दोनो भाई… उद्धव ठाकरे युतीवर स्पष्टच म्हणाले… दोघात तिसरा नको मग मविआचं काय होणार?

| Updated on: Aug 08, 2025 | 1:42 PM

इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. पण दिल्लीतना उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेसोबतच्या युतीवरून परखड भाष्य केले. आमच्या दोघांच्या चर्चेमध्ये तिसऱ्याची गरज नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यामुळे महाविकास आघाडीचा आता काय हाही प्रश्न आहे.

उद्धव ठाकरे दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीला गेले पण दिल्लीत जाऊन त्यांनी राज ठाकरे सोबतच्या युतीवर जे वक्तव्य केलं त्यावरून महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीचं काय होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. आमच्या दोघां भावांमध्ये बोलण्याची तिसऱ्यांना गरज नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर युतीचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ असं राज ठाकरेही त्यांच्या पदाधिकाऱ्यांना म्हणाले आणि आता उद्धव ठाकरेंनी सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांना तेच सांगितलंय. पण असं असलं तरी उद्धव ठाकरे काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी सोबत आहेत. त्यामुळे राज ठाकरेंना काँग्रेस चालणार आहे का किंवा याआधीची राज ठाकरेंची भूमिका पाहता त्यांना काँग्रेस चालणारच नाही. त्यामुळे मनसे सोबत युतीच्या चर्चा करायच्या आणि राहुल गांधीकडे जेवायला जायचं अशी दुहेरी भूमिका असल्याची टीका शिंदे यांचे मंत्री उदय सामंत यांनी ठाकरेंवर केली आहे.

Published on: Aug 08, 2025 01:42 PM